रजनी सावकारे यांची वरणगाव नगरपरीषदेला सदिच्छा भेट

0

विकासकामे पाहून समाधान ; नगराध्यक्षांनी केले स्वागत

भुसावळ- तालुक्यातील वरणगाव नगरपरीषदेचे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. वरणगाव शहरात सुरू असलेली विविधांगी विकासाची कामे व स्वच्छता पाहून आपल्याला मनस्वी आनंद झाल्याची भावना सावकारे यांनी व्यक्त केली. वरणगाव नगरपरीषदेने विकासकामात व स्वच्छतेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून भविष्यात वरणगाव शहर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचे शहर असेल, अशा आशावादही सावकारे यांनी व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी मुख्याधिकारी बबन तडवी, पाटील, प्रतिभा तावडे यांच्यासह साजीद कुरेशी, ज्ञानेश्‍वर घाटोळे, आकाश निमकर यांच्यासह भाजपा शहरप्रमुख सुनील माळी, भाजपा नेते मनोहर सराफ, भारतीय प्रतीरक्षा मजदूर संघाचे अनंत गाढे उपस्थित होते. दरम्यान, वरणगाव शहरात 29 जून रोजी रजनी सावकारे यांच्या वतीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वरणगावातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सुप्रसिद्ध कँसर तज्ञ डॉ.निलेश चांडक यांच्या उपस्थितीत स्तनाचा कँसरसह इतर कँसरवर मार्गदर्शन तसेच तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रजनी सावकारे यांनी केले आहे.