किरकोळ कारणातील वाद बेतला जीवावर
नंदुरबार- किरकोळ कारणावरून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील रजाळे गावात घडली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रजाळे येथील मंगलसिंग उर्फ नथा गिरासे, राजेसिंग उर्फ रावसाहेब गिरासे, प्रवीण झुलेलाल गिरासे या तिघांनी गावातीलच अरुण सोनू कोळी (35) या तरुणास लाथा-बुक्यांनी गुप्तांगावर जबर मारहाण केली. या मारहाणीत अरुण या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 22 जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप फलकाजवळ घडली या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. याबाबत मयताचा भाऊ सुरेश सोनू कोळी यांनी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या नुसार वरील तिन्ही तरुणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.