रावेर : तालुक्यातील पातोंडी येथील रहिवासी व खुनाच्या गुन्ह्यातील कैदी रजेवर आलेल्या कालावधीनंतर पसार झाल्याने त्याच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक उर्फ गोलू आनंदा तायडे (पातोंडी, ता.रावेर) असे पसार कैद्याचे नाव आहे.
रावेर पोलिसात गुन्हा
संशयीत दीपक तायडेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर अमरावती कारागृहात हलवण्यात आले होते मात्र कोरोना काळात त्यास रजेवर सोडण्यात आले मात्र रजेचा कालावधी पूर्ण होवूनही तो न परतल्याने त्यास पसार घोषित करण्यात आले. अमरावती कारागृहाचे शिपाई निना गणपतराव दांडगे यांच्या फियाृदीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अर्जुन दांडगे करीत आहेत.