रणजितसिंग पाटील यांचा निवृत्ती सेवाकार्याबद्दल झाला गौरव

0

नवापूर । येथील विद्युत वितरण कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ रणजितसिंग श्यामसिंग पाटील सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. टाऊन हॉल येथे आयोजित सेवा निरोप समारंभात अध्यक्षस्थानी महारष्ट्र राज्य वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील तर प्रमुख अतिथी अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन.बी.गांगोडे ,उपकार्यकारी अभियंता बी.एस.कोळे, सहाय्यक अभियंता एस.एम.चव्हाण, स्टेट इलेकट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे प्रमुख सल्लागार के.एम.जमदाडे, सचिव विरेंद्रसिंग पाटील ,केंद्रीय सदस्य विजय सूर्यवंशी ,सहाय्यक अभियंता राकेश गावित, शीतल पाडवी, नवापूर तालुका शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला पाटील, ए.एन. पाटील, योगेश सोनार, ,सलीम फकीर, नरेश सिसोदिया,स्वामी समर्थ केंद्राचे अशोक रणधीरे, मीनाबाई पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, धार्मिक कार्याबद्दल प्रशंसा करीत गौरव केला. यावेळी समाजबांधव वीजवितरण कंपनीचे पदाधिकारी,वर्कर्स फेडरेशनतर्फे भेट वस्तू देऊन सपत्नीक सत्कार केला.प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील सूत्रसंचालन प्रा.डॉ.आर.डी.पाटील तर आभार संदीप चौधरी यांनी मानले.