रणजितसिंग राजपूत ह्यांचा दिल्ली येथे राष्ट्रीय युवा गौरव पुरस्काराने सन्मान

0

भुसावळ- राष्ट्रीय युवा पुरस्कार संघ आयोजित नवी दिल्ली येथे राष्ट्रीय युवा परिीषद आंध्र प्रदेश भवनात पार पडली. युवकांनी राष्ट्रसेवेसाठी सज्ज व्हावे हा या परीषदेचा उद्देश होता. या रीषदेत देशभरातील विविध राज्यातील युवकांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले तसेच विविध सामाजिक विषयांवर चर्चा पार पडली. या परीषेत महाराष्ट्रमधून रणजितसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली होती. सामाजिक कार्यात संस्कृती फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आल्याची त्याच कार्याची दखल घेऊन रणजितसिंग राजपूत यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय आकडेवारी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री विजय गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री डॉ.सत्यपाल सिंग, राष्ट्रीय पुरस्कार संघ राष्ट्रीयसचिव मनीष गवई व इत्यादी मान्यवरांच्या हस्ते राजपूत ह्यांना राष्ट्रीय युवा गौरवाने सन्मानाने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, मिळालेला पुरस्कार हा अधिकाधिक सामाजिक कार्य करण्यासाठी मला सज्ज करीत असल्याची भावना राजपूत यांनी व्यक्त केली.