ठाणे । सकाळी पडलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणाचा पुरेपूर फायदा उचलत सेनादलाच्या रणजित सिंग 28 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेतील पुरूषांच्या 21 किलोमीटर अंतराची शर्यत जिंकली. रणजित सिंगने 1 तास 10 मिनीटांमध्ये ही शर्यत पूर्ण केली. महिला गटात नाशिकच्या आरती पाटीलने 15 किलोमीटरचे अंतर 57 मिनीटांमध्ये पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले. रणजितपाठोपाठ नाशिकचा पिटूंकुमार यादव आणि अलिबागचा सुजित गमरे पुरूष गटात अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या स्थानावर राहिले. महिलांमध्ये दुसरे स्थान मुंबईच्या वर्षा भवानीने मिळवले तर पुण्याची ज्योती चव्हाण तिसर्या स्थानावर राहिली. पुरूष गटात विजयी ठरलेल्या रणजितला 75 हजार आणि महिला गटातील विजेती आरतीला 50 हजार रुपयांचा रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेतील गटनिहाय निकाल
21 कि.मी. (पुरुष गट) : रणजित सिंग (सेनादल,प्रथम), पिंटू यादव ( नाशिक, व्दितीय), सचिन गमरे, (अलिबाग, तृतीय), तानाजी नलावडे (चतुर्थ), महेश वढाई (पाचवा).
15 कि.मी (महिला गट) : आरती पाटील (भोसले मिलिट्री कॉलेज, नाशिक.प्रथम), वर्षा भवानी (मुंबई पोलिस,व्दितीय), ज्योती चव्हाण ( संग्राम प्रतिष्ठान पुणे. तृतीय), पुरुष गट (सर्वसाधारण) – 10 किमी : ज्ञानेश्वर मोगरा, (पालघर, प्रथम), अमित माळी, (पालघर, व्दितीय), युवराज तेथले, (पालघर, तृतीय).
18 वर्षाखालील मुले : 10 किमी : प्रकाश देशमुख (वाशी, प्रथम), दिनेश म्हात्रे (वनवासी कल्याण आश्रम, व्दितीय), शिवाजी गोसावी (चंद्रपूर जिल्हा स्टेडीयम, तृतीय).
15 वर्षाखालील मुले : 5 किमी : अक्षय सावंत (शारदा विद्यामंदीर, अनगांवप्रथम), मनोज गोविंद (जय संतोषी माता, अनगांव व्दितीय), अशोक वारगुडे ( एम.एच. विद्यालय, तृतीय),
15 वर्षाखालील मुली : 5 किमी : अश्विनी मोरे (राजश्री शाहू नवी मुंबई, प्रथम), नेहा फुफाणे (शारदा विद्या मंदीर, व्दितीय), किशोरी मोकाशी ( शिवभक्त विद्यामंदीर बदलापूर,तृतीय),
12 वर्षाखालील मुले : 3 किमी : संजय बिंद (गार्डियन हायस्कुल, डोंबिवली, प्रथम), अमोल भोये (शारदा विद्यामंदीर, अनगांव, व्दितीय), अनिल वैजल, (शारदा विद्यामंदीर, अनगांव. तृतीय),
12 वर्षाखालील मुली : 3 किमी : परीना खिल्लारी (ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल, ठाणे, प्रथम), यज्ञिका दळवी ( राजर्श्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय, नवी मुंबई, व्दितीय), पल्लवी झा (जिंदाल स्पोर्टस्, वाशिंद, तृतीय)