रणजी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

0

मुंबई । बीसीसीआयने आपल्या स्पर्धांमधील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. रणजी करंडक स्पर्धेला दोन आठड्यांमध्ये सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतींना 6 ऑक्टोबर पासून सुरुवात होईल. स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीच्या लढती 7 ते 11 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येतील. उपांत्य फेरीचे दोन सामने 17 ते 21 डिसेंबर दरम्यान रंगतील. अतिम सामना 29 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान रंगेल. यंदाच्या हंगामात 28 संघ सहभागी होणार असून या संघांना चार गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. यंदाच्या हंगामात प्रत्येक संघाला आपल्या घरच्या मैदानावर एक सामना खेळण्याची संधी मिळणार आहे.

रणजी स्पर्धेतल्या संघांची गटवारी
अ गट – कर्नाटक, दिल्ली, आसामा, महाराष्ट्र, हैदराबाद, उत्तर प्रदेश, रेल्वे
ब गट – झारखंड, गुजरात, केरळ, सौराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर
क गट – मुंबई, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडीशा, बडोदा, त्रिपुरा
ड गट – हिमाचल प्रदेश, विदर्भ, पंजाब, बंगाल, सेनादल, गोवा, छत्तीसगड