मुंबई : बॉलीवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होणे हे फारसे काही नवीन नाही. नुकतेच,अर्जुन कपूर आणि बहीण जान्हवी कपूर या दोघांनी ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
या शो दरम्यान करणनं अर्जुला एक प्रश्न विचारला, प्रेमाबद्दल सल्ला हवा असेल तर तू वरूण आणि रणबीर यापैकी कोणाला विचारशील असा प्रश्न करणनं अर्जुनला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देतांना रणबीर कपूरकडून कोणीही प्रेमाबद्दल सल्ला घेऊ नये, त्याच्या सांगण्यावरून मी ब्रेकअप केलं आणि नंतर मला त्याचा खूपच पश्चाताप झाला असं उत्तर अर्जुननं दिलं. त्यामुळे मी कधीही रणबीरकडे प्रेमाविषयी सल्ले मागायला जाणार नाही असंही अर्जुन गंमतीनं सांगितलं.