रणबीर अतिशय शुद्ध व साधा माणूस-आलीया भट्ट

0

मुंबई- रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे अलीकडच्या काळात एकमेकांच्या खूप जवळ आलेले आहे. दोघांच्या रिलेशनबद्दल अनेक चर्चा सुरु आहे. ब्रह्मास्त्र हा त्यांचा आगामी चित्रपट लवकरच येत आहे. ते दोघेही एकत्र फिरतांना देखील अनेक ठिकाणी आढळले आहे. एका कार मधून प्रवास करतांना देखील ते दिसले आहे. दरम्यान आलीयाला रणबीरबद्दल काय वाटते याबाबत खुद्द आलियाने खुलासा केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मी रणबीर सोबत काम करते आहे. वैयक्तिकरित्या त्याच्याशी भरपूर संवाद साधला आहे, त्यांच्याबद्दल मला खरंच खूप प्रेम आहे. रणबीर सहृदयी आहेत. तो एक अतिशय शुद्ध आणि साधा माणूस आहे असे आलीया म्हणते. मला रणबीरच्या सर्व गोष्टी आवडायला लागली आहे. त्यांची अशी कोणतीही गोष्ट नाही जी मला आवडत नाही असे आलिया बोलून दाखवते आहे. .