मुंबई : बॉलीवूडच नवीन कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा सुरूच असतात. अश्यावेळी आलियाचे वडील महेश भट्ट यांनी यांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली.
आलिया प्रेमात पडली आहे, असे महेश भट्ट म्हणाले. मला रणबीर कपूर आवडतो. या दोघांना आपल्या नात्याबद्दल स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जो काही निर्णय घ्यायचा तो त्या दोघांनीच घ्यायचा आहे. त्या दोघांना कोर्ट मॅरेज करायचे आहे आणि हे असे त्यांनी का ठरवले याबाबत ते दोघेच सांगू शकतील, असेही ते म्हणाले. यावरुन स्पष्ट होतंय की महेश भट्ट यांनी आलियाच्या पसंतीला ग्रीन सिग्नल दिला आहे.