रणबीर कपूरने आलियाबरोबरच्या नात्याविषयी सोडले मौन

0

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगपासूनच रणबीर- आलियाच्या नात्याविषयी चर्चा होऊ लागल्या असून सोशल मीडियावर व्हायरल झालेले दोघांचे फोटो असो किंवा मग सोनम कपूरच्या रिसेप्शनला या जोडीने एकत्र लावलेली हजेरी असो, रणबीर- आलिया एकमेकांना डेट करत आहेत का, असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावू लागला.

????

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on

 

प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आता दोघंही एकमेकांविषयी मोकळेपणाने बोलू लागले असून रणबीरने आलियाविषयी नुकताच एक खुलासा केला आहे. रणबीरने आलिया त्याची ‘क्रश’ crush असल्याचे ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. आलीयानेही रणबीर कपूर तिला सर्वाधिक आवडत असल्याचे तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तसेच आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर रणबीरसोबतचा फोटोसुद्धा शेअर केला होता. त्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजतेय, हे या मुलाखतीतून स्पष्ट होतेय असे म्हणायला हरकत नाही.