मुंबई : सध्या बॉलीवूडची चर्चित जोडी म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. अनेकदा दोघांनाही सोबत स्पॉट केले आहे. दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याचा खुलासा केला नसला, तरी त्यांचे नाते जगापासून लपलेले नाही.
आलियाने सध्या रणवीर सिंगसोबत ‘गली बॉय’ चित्रपटातकाम केले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग दरम्यान आलियाला रणबीर आणि रणवीरबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिने सांगितले की, ‘दोघेही सारखेच आहेत, फक्त एकासोबत मी गली बॉयमध्ये काम करतेय, तर दुसऱ्यासोबत ‘ब्रम्हास्त्र’मध्ये काम करत आहे’. तिच्या या उत्तरावर लगेचच रणवीर म्हणाला की, ‘एक थोडा जास्त स्पेशल आहे आणि एक थोडा कमी’. त्याच्या या फिरकीवर आलियालाही हसू आवरता आले नाही.