मुंबई : बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग आणि बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोन काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. या विवाहानंतर रणवीरने दीपिकाचे कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. इतकेच नाही, तर रणवीरने आपल्या नावासमोर दीपिकाचे नाव लावायलादेखील तयार असल्याचे म्हटले होते.
दीपिकाने तुझ्या कोणत्या सवयींवर बंदी घातली आहे? असा सवाल रणवीरला करण्यात आला. याचे उत्त्तर देत रणवीर म्हणाला, रात्री उशिरापर्यंत घराबाहेर थांबायचं नाही, असं स्पष्ट शब्दांत दीपिकाने मला सांगितलं आहे. याशिवाय कितीही घाईत असेल तरी उपाशीपोटी घराबाहेर पडायचं नाही आणि महत्त्वाचे म्हणजे एखाद्या कामात असताना मी तिचा कॉल घेऊ शकलो नाही, तर वेळ मिळताच लगेचच फोन करायचा, असे दीपिकाने आपल्याला बजावून सांगितले असल्याचेही रणवीर यावेळी म्हटला.