रत्नाकर गुट्टेंवर गुन्हा दाखल

0

गंगाखेड । गंगाखेड शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी 10 हजार शेतकर्‍यांच्या नावे बनावट कागदपत्र तयार करून 328 कोटी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली. आता या डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह संचालक मंडळ, कर्मचारी आणि बँकेच्या अधिकार्‍यांविरूद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. ए.एम. ढवळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक शाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे करीत आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे गंगाखेड परिसरात खळबळ माजली आहे.

पाच राष्ट्रीयकृत बँका पाच राष्ट्रीयकृत बँका आणि एका खासगी बँकेच्या अधिकार्‍यांशी संगनमत करून गंगाखेड शुगर अ‍ॅन्ड एनर्जी लि. कारखान्याच्या संचालक मंडळाने परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांच्या नावावर तब्बल 328 कोटींचे कर्ज उचलले असल्याचा आरोप आहे.

एकूण 6 बँकानी दिले कर्ज
गिरीधर सोळंके यांनी केलेल्या फिर्यादीवरून कारखान्याचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह अधिकृत संचालक मंडळ, आर्थिक व्यवहार सांभाळणारे तसेच पीक कर्जाची कामे हाताळणारे शेतकी अधिकारी, कर्मचारी, बनावट शिक्के व कागदपत्र तयार करणारे कर्मचारी, खाजगी व्यक्ती आणि आंध्रा बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, सिंडीकेट बँक, रत्नाकर बँकेचे अधिकारी यांच्याविरूद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दरम्यान, रात्री उशिरा औरंगाबाद पोलिसांच्या माध्यमातून डॉ. रत्नाकर गुट्टे यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

कर्ज मिळणे झाले दुरापास्त
पाच राष्ट्रीयकृत बँका आणि एका खासगी बँकेच्या अधिकार्‍यांशी संगनमत करून गंगाखेड शुगर अ‍ॅन्ड एनर्जी लि. कारखान्याच्या संचालक मंडळाने परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांच्या नावावर तब्बल 328 कोटींचे कर्ज उचलल्याने या शेतकर्‍यांना कोणत्याही बँकेचे कर्ज मिळणे दुरापास्त झाले आहे. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर हा व्यवहार
किमान 1 हजार कोटींच्या घरात जाईल आणि यात जवळपास दहा ते पंधरा हजार शेतकरी अडकलेले सापडतील, असा अंदाज आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी च्यक्त केला आहे.