रत्नाकर गुट्टे महाराष्ट्राचा नीरव मोदी!

0
साडेपाच हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा  धनंजय मुंडे यांचा आरोप 
नागपूर-परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड साखर कारखान्याचे संचालक रत्नाकर गुट्टे यांनी बनावट कंपन्यांची नोंदणी करून बँकांची आणि शेतकऱ्यांची साडेसात हजार कोटी रुपयांची फसवणूक केली असून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  विधानपरिषदेत केला.
एसआयटीचे काम अत्यंत धीम्या गतीने
गुट्टे यांना अद्याप अटक का केली नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.  मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत गुट्टे यांनी सुमारे सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या नावाने बँकांकडून परस्पर कर्ज घेतल्यामुळे या शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीसा आल्या आहेत असे सांगितले. या घोटाळ्याच्या चौकशी साठी न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या एसआयटीचे  काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितले.
सभापतींनी व्यक्त केली चिंता 
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला मात्र हा नीरव मोदी इतकाच गंभीर घोटाळा असल्याचं सांगत सध्याची एसआयटी न्यायालयाच्या देखरेखीखाली नसेल तर नव्याने एसआयटी स्थापन करून सहा ते सात महिन्यांच्या आत कालबद्ध रीतीने  ही चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश सभापतींनी दिले .या घोटाळ्यामुळे बँकिंग व्यवस्था डबघाईला येऊ शकते असे सांगत सभापती निंबाळकर यांनी चिंता व्यक्त केली.