भुसावळ। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात चौथ्या लाईनच्या कनेक्टिव्हिटीचे काम सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 23 डिसेंबरपासून ब्लॉक घेतला होता. परिणामी भुसावळ विभागातून बिलासपूर विभागात जाणार्या 18 गाड्या रद्द झाल्या होत्या. मात्र, एक जानेवारीपासून या गाड्या पुन्हा पूर्ववत सुरू झाल्या. गाडी क्रमांक 12870 हावडा-मुंबई, 12869 मुंबई-हावडा, 12812 हटिया-एलटीटी, 22866 पुरी-एलटीटी, एलटीटी-पुरी, 12880
भुवनेश्वर-एलटीटी, एलटीटी-भुवनेश्वर, 22512 कामाख्य-एलटीटी, एलटीटी-कामाख्य, 12810 हावडा- मुंबई, मुंबई-हावडा एक्स्प्रेस, 12151 एलटीटी- शालीमार, शालीमार-एलटीटी, पोरबंदर ते संत्रागाची, संत्रागाची ते पोरबंदर, हावडा-साईनगर शिर्डी गाडी नेहमीप्रमाणे धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.