रन फॉर भुसावळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ- निरामय व सृदृढ आरोग्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेला भुसावळकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तीन गटात सहभागी असलेल्या एक हजार 250 स्पर्धकांसह शहरवासीयांनी स्पर्धेत सहभागी होवून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. पहाटेच्या आल्हाददायी वातावरणात पार पडलेल्या व अत्यंत काटेकोर नियोजन असलेल्या स्पर्धेने भुसावळकर सुखावले. शहरात प्रथमच अशा पद्धत्तीने झालेल्या स्पर्धेचे शहरवासीयांनी स्वागत करीत पोलीस प्रशासनाला धन्यवादही दिले. तीन, पाच व दहा किलोमीटर अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आली. 12 वयोगटाच्या स्पर्धकापासून वयाच्या पंच्याहत्तरी गाठलेल्या चिरतरुण स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत सर्वांचाच उत्साह वाढवला.
तीन गटात स्पर्धा
तीन गटात स्पर्धा घेण्यात आली. सुरुवातीला दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, नगराध्यक्ष रमण भोळे, सिद्धीविनायक ग्रुपचे संचालक कुंदन ढाके आदींनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर पाच व तीन किलोमीटर अंतराच्या गटासाठी स्पर्धेला सुरुवात झाली.
स्पर्धेसाठी वाहतूक थांबवली, काटेकोर नियोजन
स्पर्धकांना कुठलाही त्रास होवू नये यासाठी शहरातील विविध मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करून वाहतूक थांबवण्यात आली होती शिवाय महामार्गावरील वाहतूकही काही वेळासाठी पोलिसांनी थांबवली. स्पर्धकांसाठी रस्त्यावर रुग्णवाहिका तसेच पाणी व लिंबू सरबताची सोय करण्यात आली शिवाय स्पर्धेवर ड्रोन कॅमेर्याचीही नजर राहिली. आरएफआयडी तंत्रज्ञानामुळे स्पर्धकांचे काटेकोर निरीक्षण करता आले व त्यामुळे किती मिनिट व सेकंदात स्पर्धकाने अंतर कापले याचे निरीक्षण नोंदवून त्यातून विजेते ठरवण्यात आले. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला गुडी बॅग, प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले.
गटनिहाय स्पर्धेतील विजेते असे
कंसात अंतर पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी मिनिटांमध्ये
तीन किलोटर (पुरूष)- प्रथम- प्रथम व्यवहारे (10.1), द्वितीय- ऋषीकेश पाटील (10.15), तृतीय- संभाजी पाटील (10.400)
तीन किलोमीटर सिनीयर सिटीजन- प्रथम- प्रकाश तायडे (23.10), प्रेमराज लढे (23.13), लिलाधर अग्रवाल (24.53)
तीन किलोमीटर महिला- प्रथम मोहिनी जगदाडे (11.20)
पाच किलोमीटर (महिला)- प्रथम- मय्यमा जोसेफ (24.12)
पाच किलोमीटर (पुरूष)- प्रथम- मयूर सोनवणे (17.18), द्वितीय- राहुल पाटील (17.24), तृतीय- उमेश पाटील (17.28)
दहा किलोमीटर (महिला)- प्रथम- अश्विनी काटोळे (43.27)
दहा किलोमीटर (पुरूष)- विशाल कुंभार (34.56), द्वितीय- अमोल पाटील (37.11), तृतीय- सतीश शेजवळ (40.41)
स्पर्धेसाठी यांनी घेतले परीश्रम
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, उपनिरीक्षक विशाल पाटील, नियोजन समितीचे यतीन ढाके, अजय भोळे, विकास पाचपांडे, मनोज पिंपळे, प्रा.प्रवीण फालक, शुभम महाजन, मनीष नेमाडे, डॉ.तुषार पाटील, क्रीडा शिक्षक रमण भोळे, रवी निमाणी, समीर पाटील, अनिल आर.चौधरी, वरुण इंगळे, नितीन धांडे आदींनी परीश्रम घेतले.