स्पर्धेत सहभाग नोंदवण्याचे आयोजकांनी केले आवाहन
भुसावळ- रन भुसावळ रन स्पर्धेला शहरवासीयांचा गत वर्षाप्रमाणेच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत या स्पर्धेसाठी 700 स्पर्धकांनी नोंदणी केली असून मोठ्या संख्येने शहरवासीयांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ज्या स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी ट्रेनिंग सेशन दर गुरूवारी व रविवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्राऊंड (डी.एस.ग्राऊंड) वर दिले जात आहेत. या ठिकाणी प्री रन व पोस्ट रन स्ट्रेचिंग कसे करावे याबाबत योगा शिक्षक पूनम भंगाळे व गोदावरी अभियांत्रिकीचे व्हा.प्रिंन्सीपल प्रवीण फालक मार्गदर्शन करणार आहेत. ट्रेनिंग सेशनची वेळ पहाटे सहा ते सात दरम्यान आहे. प्रसंगी भुसावळ रनर ग्रुपचे सदस्य ही हजर राहुन त्यांना आलेले अनुभव आपणास प्रत्यक्ष सांगणार आहेत. स्पर्धेत सहभागाचे आवाहन आयोजन कमेटीने केले आहे.