‘रन भुसावळ रन’ साठी शहरात ऑनलाईन नोंदणीला सुरुवात

0

भुसावळ- भुसावळकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेल्या ‘रन भुसावळ रन’ मॅरेथॉन स्पर्धा सलग दुसर्‍या वर्षी शहरात घेण्यात येत असून 1 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे. 13 जानेवारी रोजी ही स्पर्धा होणार असून तत्पूर्वी 1 ते 31 डिसेंबर या काळात नावनोंदणी केली जाणार आहे. तीन किलोमीटर, पाच किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी दिली. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मॅरेथॉनच्या कार्यकारी सदस्यांची दररोज बैठक होत असून त्यात कामांचा आढावा घेतला जात आहे. शहरातील विविध भागांमध्ये रन भुसावळचे फलक लावण्यात आले आहेत. ऑन लाईन नोंदणीसाठी ‘रन भुसावळ रन’ या नावाची बेवसाईट तयार करण्यात आली आहे.