’रन भुसावळ रन’ स्पर्धेतील स्पर्धकांना उद्या कीटचे वाटप

0

संतोषी माता हॉलमध्ये पावती दाखवून कीट नेण्याचे आवाहन

भुसावळ- जिल्हा पोलिस दल व सिद्धीविनायक ग्रुप, आमदार संजय सावकारे, बियाणी स्कूल व गोदावरी फाऊंडेशनच्या विद्यमाने सलग दुसर्‍या वर्षी होत असलेल्या ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेतील स्पर्धकांना शनिवार, 12 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी सहा दरम्यान शहरातील मातृभूमी चौकातील संतोषी माता सभागृहात टी शर्ट आणि किटचे वाटप केले जाणार असून स्पर्धकांनी पैसे भरल्याची पावती दाखवून कीट न्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

एक हजार 500 स्पर्धकांनी केली नोंदणी
रन भुसावळ रन स्पर्धेसाठी एक हजार 500 स्पर्धकांनी नोंदणी केली असून यातील 950 स्पर्धक तीन किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत धावतील तर उर्वरित 450 स्पर्धक त्यापेक्षा जास्त अंतराच्या स्पर्धेत धावणार आहे. या स्पर्धकांमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, महिलांनी सहभाग नोंदवला आहे. 13 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून स्पर्धेला सुरवात होईल. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, डीआरएम आर.के. यादव हे देखील सहभागी होणार आहेत.