रन भुसावळ रन स्पर्धेतील स्पर्धकांना कीटचे वाटप

0

निरामय आरोग्यासाठी उद्या धावणार भुसावळकर

भुसावळ : शहरात जिल्हा पोलिस दलातर्फे ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेचे रविवार, 5 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. निरामय व सृदृढ आरोग्यासाठी स्पर्धकांसह भुसावळकरदेखील पहाटेच्या आल्हाददायी वातावरणात धावणार असून स्पर्धेच्या पूर्वसंध्येला शनिवारी नोंदणी केलेल्या सुमारे अडीच हजार स्पर्धकांना शहरातील संतोषी माता सभागृहात कीटचे वाटप करण्यात आले. या स्पर्धेसाठी आमदार संजय सावकारे, सिद्धीविनायक ग्रुप, बियाणी एज्युकेशन व गोदावरी फाऊंडेशनचे सहकार्य लाभत आहे.
तीन गटात होणार स्पर्धा ः असा आहे मार्ग
ही स्पर्धा तीन, पाच व दहा किलोमीटर अंतरासाठी होत आहे. तीन किलोमीटर अंतरासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून लोखंडी पूल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड पासून युटर्न घेऊन पुन्हा डॉ. आंबेडकर मैदान तर पाच किलोमीटर अंतरासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डीएस ग्राऊंड) पासून लोखंडी पूल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड, हॉटेल हेवन पासून युटर्न घेत पुन्हा मैदान तर 10 किलोमीटर अंतरासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून लोखंडी पूल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड, हॉटेल हेवनपासून युटर्न घेत वसंत टॉकीज रिक्षा थांबा, दोन नंबरचा पेट्रोल पंपाजवळील डाव्या बाजूला वळत सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, कोनार्क हॉस्पीटल, वाय पॉइंटपासून युटर्न घेत पुन्हा डी.एस.ग्राऊंड असा स्पर्धेचा मार्ग राहणार आहे. 10 किलोमीटर अंतरातील स्पर्धकांनी 5 जानेवारी रोजी पहाटे 5.15 वाजता उपस्थित रहावे तसेच सहा वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल तसेच 5 किलोमीटर अंतरातील स्पर्धकांनी पहाटे 5.40 वाजता उपस्थित रहावे व 6.20 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार असून 3 किलोमीटर अंतरासाठी 6.15 ला उपस्थित राहिल्यानंतर सात वाजता स्पर्धेला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरूवात होईल, असे आयोजकांनी कळवले आहे.

या मान्यवरांची स्पर्धेसाठी राहणार उपस्थिती
स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाके, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, प्रातांधिकारी रामसिंग सुलाणे, ऑर्डनन्स फॅक्टरीचे जी.एम राजीव पुरी, सहाय्यक जीएम सुधीर मलिक, मिलीटरी स्टेशनचे कमांडर करण ओहरी, आमदार संजय सावकारे, डीआरएम विवेककुमार गुप्ता, दीपनगर प्रोजेक्टचे मुख्य अभियंता पी.ए.सपाटे, विवेक रोकडे, अधिकारी, नगराध्यक्ष रमण भोळे, सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन कुंदन ढाके, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, उद्योगपती मनोज बियाणी, पालिका मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे

स्पर्धा यशस्वीसाठी यांचे परीश्रम
स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजन समितीतील पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक के.टी.सुरळकर, सिद्धीविनायक ग्रुपचे संचालक यतीन ढाके, विकास पाचपांडे, शुभम महाजन, अजय भोळे, समीर पाटील, प्रवीण वारके, अ‍ॅड.तुषार पाटील, अनिल आर.चौधरी,कुंदन पाटील, प्रा.प्रवीण फालक, क्रीडा शिक्षक रमण भोळे, मनीष नेमाडे, वरूण इंगळे, प्रवीण पाटील, डॉ.तुषार पाटील, चेतन पाटील, रणजीत खरारे, विघ्नहर्ता पब्लिकेशनचे रवी निमाणी आदी परीश्रम घेत आहेत.