माँट्रियल । अव्वल मानाकंन मिळालेल्या रफाएल नदालला एटीपी मॉट्रियल मास्टर्स टेनिस स्पर्धेतील तिसर्या फेरीत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. वाइल्डकार्डद्वारे थेट प्रवेश मिळालेल्या आणि अपरिचीत असलेल्या कॅनडाच्या 18 वर्षीय डेनिस शापोवालोव्हने स्पर्धेत मोठा उलटफेर करताना नदालचा 3-6, 6-4, 7-6 असा पराभव केला.
नदालने या सामन्यासह नंतरच्या लढतीत चुंग हायोन किंवा एड्रियन मानारिनोला हरवले असते, तर तो पुन्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला असता. शापोवालोव्हने स्पर्धेतील पहिल्या फेरीत ब्राझिलच्या रोजेरियो डिसिल्वा आणि दुसर्या लढतीत अमेरिकन ओपनचा माजी विजेता जुआन मार्टिन डेल पात्रोला हरवले होते. अन्य लढतींमध्ये रॉजर फेडररने डेव्हिड फेररला 4-6, 6-4, 6-2 असे हरवले. पुढील सामन्यात फेडररला स्पेनच्या रॉबर्टो बाउतिस्ता एगटशी दोन हात करावे लागतील. रॉबर्टोने फ्रांसच्या गाएल मॉफिल्सला हरवले होते.