रबर स्टॅम्प म्हणजेच राष्ट्रपती

0

मुंबई : ज्यांची सत्ता त्यांचा रबर स्टॅम्प म्हणजेच राष्ट्रपती असा उल्लेख करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रपतीपद निवडणुकीवर भाष्य करीत जे राष्ट्रपती सामान्यांच्या विषयांवर काही करत नाहीत, असे राष्ट्रपती लोकांच्या काय कामाचे असा सवालही त्यांनी केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीबाबत एका टिव्ही चॅनेलशी बोलताना त्यांनी केलेल्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

देशात शेतकर्‍यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत, मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाले. त्यावेळी कुठं होते राष्ट्रपती. या विषयावर त्यांनी काय केले. देशातील नागरिक त्यांना पत्र पाठवून, ई मेल करून त्यांच्या प्रश्नांविषयी सांगतात. एकालाही त्यांनी उत्तर दिल्याचे ऐकलं नाही. मग असे राष्ट्रपती आमच्या काय कामाचे? असा सवालही ठाकरे यांनी केला.

केंद्र व राज्य सरकारकडून दडपशाही सुरू आहे. त्याबद्दल ते राष्ट्रपती कधी बोलतही नाहीत. याकूब मेमनच्या फाशीप्रसंगी राष्ट्रपतींचा उल्लेख झाला होता. त्याशिवाय त्यांचे नावही ऐकायला मिळत नाही. राष्ट्रपती कोविंद झाले काय नी गोपाळ झाले काय आम्हाला काहीच फरक पडत नाही.
– राज ठाकरे,
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना