रबाले विभागासाठी दोन महावितरण कार्यालयाची गरज

0

घणसोली : महावितरणच्या नियमानुसार स्थानिक कार्यालयाच्या हद्दीमध्ये वीस हजाराच्यावर ग्राहक असतील तर दुसरे कार्यालय निर्माण करणे गरजेचे आहे. परंतु घणसोली ते ऐरोली दरमान्यन पन्नास हजारच्यावर ग्राहक गेले तरी दुसरे कार्यालय सुरु न केल्याने असलेल्या कर्मचारी व अधिकार्‍याना भयानक त्रास होत आहे. तसेच असलेले कर्माचारीही कामीच असल्याने अडचणी मध्ये वाढच झाली आहे. त्यामुळे या परिसरात नवीन कार्यालय सुरु करावे या मागणी जोर धरू लागला आहे. घणसोली, रबाले व एरोलीचा काही भाग गोठीवली येथे असलेल्या महावितरणच्या कार्यालयाच्या अंतर्गत येतो. या कार्यालयाच्या नोंदीनुसार पन्नास हजाराच्या आसपास वीज ग्राहक आहेत.

कर्मचार्‍यांना करावी लागतेय तारेवरची कसरत
सध्या गोठीवली येथे असलेल्या कार्यालयात एक अभियंता असून 16 कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे. त्यांना घणसोली ते ऐरोली परिसरात सेवा द्यावी लागत असल्याने तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे महावितरण सूत्रांनी माहिती दिली. यापरिसरात कार्यावर असणार्‍या कर्मचाऱयांना दोन कार्यालयाच्या कर्मचार्‍यां एव्हढे सद्यस्थितीत काम करावे लागत असल्याने कर्मचार्‍यांची अवस्था दैयनिय झाल्याचे दिसून येत आहे. आधीच एक कार्यालयासाठी लागणारे मनुष्यबळ नाही त्यात दोन कार्यालयाच्या आवाक्याचे काम करावे लागत आहे.