रमजानच्या तिसरे पर्व दोजखसे खलासीला सुरुवात

0

शेवटच्या पर्वात दोन जुम्मे शुक्रवार येण्याचा विलक्षण योग

यालव (शेख काबीज) : पवित्र रमजान महिन्याच्या तिसर्‍या आणि अत्यंत महत्वाच्या पर्वास जुम्मा शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. दुसरे पर्व मगफिरत (चुका पासून क्षमा याचना) द्वारे सुटका होणार्‍या या पर्वाची आज 14 मे गुरुवारी समाप्ती होऊन 15 मे जुमा (शुक्रवार) पासून तिसरे पर्व दोजख से खलासी (नरकापासून सुटका) ला सुरुवात झाली. विशेष म्हणजे या शेवटच्या पर्वात दोन जुम्मे (शुक्रवार ) येण्याचा विलक्षण योग आला आहे.

तीन पर्वात विभागला रमजान महिना
पवित्र रमजान महिना हा दहा दिवशीय तीन पर्वामध्ये विभागला गेला आहे याचे पहिले पर्व रेहमत (कुर्पा दृष्टी) दुसरे पर्व मग्फिरत (चुकांपासून सुटका) हे महत्वाचे पर्व संपले. या पर्वाचा मुस्लीम बांधवानी लाभ घेतला. या शेवटच्या पर्वाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या पर्वाची एक रात्र म्हणजे सर्वोकृष्ट रात्र आहे ती रात्र म्हणजे शबे कद्र. या रात्रीचे वैशिष्ट्य म्हणजे एक हजार महिन्यापेक्षा म्हणजे 83 वर्षे चार महिन्यांपेक्षा श्रेष्ठ अशी ही रात्र आहे.

शेवटच्या पर्वात दोन जुम्मे येण्याचा योगायोग
जुम्मा (शुक्रवार) इस्लाम धर्मातील मुस्लीम समाज बांधवासाठी पवित्र आहे आणि याच दिवसापासून या शेवटच्या पर्वास सुरुवात होत आहे विशेष म्हणजे रमजान महिन्यात जुम्मा (शुक्रवार) जास्त महत्व असते आणि या शेवटच्या पर्वात दोन जुम्मे (शुक्रवार) येण्याचा चांगला योग्य आला आहे. या शेवटच्या पर्वात शबे कद्र ही सर्वोकृष्ट रात्र येते मात्र ही रात्र हदीसात म्हटल्याप्रमाणे या पर्वातील 21,23,25,27,29 या पाच रात्री मध्ये शोधावी मात्र सर्वत्र 27 वी रात्र ही शबे कद्र म्हणून साजरी केली जाते. रात्रभर प्रार्थना, शमा, याचना भक्ती या रात्रीमध्ये समाज बांधव करतात. शेवटच्या पर्वात अनेक समाज बांधव एहीतीकाफ करतात त्यांना हमखास ही रात्र मिळते. विशेष म्हणजे या शेवटच्या पर्वात मुस्लीम समाज बांधव रोजा नमाज पठन कुराण पठण इबादत (भक्ती) करून नरका पासून सुटकेसाठी प्रयत्न करतात या पर्वातच नव्हे तर पूर्ण महिना आपली वेळ पुण्य व सत्कर्म करण्यासाठी खर्च करतात शेवटच्या पर्वात इबादत (भक्ती )चे प्रमाण वाढते तसेच या शेवटच्या पर्वाचाही समाज बांधव पूर्ण लाभ घेतात.

लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे शिवाय पवित्र रमजान महिना साजरा केला जात आहे. पवित्र रमजान महिन्याचे मुस्लीम धर्मात खूप मोठे अनन्य साधारण साधारण महत्व आहे. मात्र ‘रमजान पर्व’ साजरे करीत असतांना मुस्लीम धर्मीय भाविकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. तसेच घरघुती वातावरणातच दैनदिन सर्व धार्मिक विधी पार पाडले जात आहे तसेच गावातील मशिदीत मोजकेच भाविक जाऊन ‘सोशल डिस्टस्टींग’ चे काटेकोरपणे पालन करीत धार्मिक विधी पर पाडत आहे. लॉकडाऊनची परिस्थिती असून सुद्धा गावातील सर्व मुस्लीम बांधव पवित्र रमजान महिन्यातील धार्मिक विधी मोठ्या उत्साहात, आनंदात व ईश्वराच्या भक्तीने साजरी करीत आहेत. कोरोना या महाभयानक आजारापासून विश्वातील संपूर्ण मानव जातीची लवकरात-लवकर सुटका व्हावी व त्यांना निरोगीमय आयुष्य जगता यावे यासाठी रोजेदार व सर्व मुस्लीम बांधव ईश्वराकडे प्रार्थना करीत आहेत.