भुसावळ। मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु असल्यामुळे रात्री नमाज पठणानंतर रोजे सोडण्यासाठी आवश्यक पदार्थ विक्रेत्यांना रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल यांना निवेदन देण्यात आले.
परवानगी द्यावी
रमजान महिन्यात ईद पर्यंत आणि चाँद रात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत धार्मिक रितीरिवाजानुसार रमजान साजरा केला जातो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर माजी नगराध्यक्ष आशिकखान शेरखान, पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, जाकिर हुसेन यांच्या स्वाक्षर्या आहे.