रमजान ईदच्या पार्श्‍वभुमीवर नंदुरबार पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

0

नंदुरबार। दंगल प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेले उपोषण आणि करण्यात आलेल्या मागण्या पोलिसांच्या अडचणीत वाढ करणार्‍या ठरू पाहत आहेत,एकंदरीत हे नाजूक प्रकरण हाताळण्याचे पोलीस यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले आहे. नंदुरबार शहरात दहा जूनला दंगल झाली होती.

याप्रकरणी पोलीसानी दोन्ही समाजातील तरुणांना अटक करण्याची कारवाई सुरू केली आहे. मात्र यात हिंदू मुलांवर अन्याय होत असल्याची तक्रार विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाने केली आहे. यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी गुरुवारी पोलीस ठाण्यासमोर लाक्षणिक उपोषण केले. दंगल घडविणार्‍या समाजकंटकाना आणि पेट्रोल पंप जाळण्याचा प्रयत्न करणार्‍याना अटक करावी, अशी मागणी केली आहे. ही कारवाही झाली नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असा ईशारा दिला आहे. त्यावर कारवाही करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिले आहे. कारण एक दिवसावर ईद येऊन ठेपली आहे. अशा नाजूक परिस्थितीत ही कारवाही करणे धोक्याचे होऊ शकेल, आणि नाही केली तर कोणतेही आंदोलन होऊ शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,यामुळे हे प्रकरण पोलिस अधिकारी आता कसे हाताळतात याकडे नंदुरबारकरांचे लक्ष लागून आहे.