मौलाना मोहम्मद फज्ले हक मिस्बाही
सुबानिया मस्जिद, काळेवाडी
प्रिय इमानवालो,
हे देखील वाचा
आपल्यावर रोजे करण्याचे निर्बंध लादले आहेत, कारण पूर्वीच्याही लोक नित्याने रोजे करतच होते. कारण आपण अल्लाहला घाबरणारे, माननारे अंतकरणाने अत्यंत निर्मळ आहात याची प्रचिती यातून येते. इस्लामी दिनदर्शिकाही १२ महिन्यांचीच असते. या दिनदर्शिकेचा आरंभ मोहरम मासापासून सुरु होतो. तर ‘जिलहज’ या महिन्याने शेवट होतो. या दिनदर्शिकेतील ९ वा महिना रमजान आहे. याच महिन्यामध्ये अल्लाहने रोजे पाळले होते. याच महिन्यात दैवी ग्रंथ कुराण शरीफ प्रकटले होते. त्यांनी त्यांच्या अनुययांना या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे या शिकवणीचे पालन करावे, ज्याप्रमाणे नमाज हज, जगात, हराम, हलाल या सर्व गोष्टीचे पालनकर्ते व्हावे.
मात्र आवश्यकता या गोष्टीची होती की, प्रत्येक अनुययाने अशी एक पूजा-अर्चा करावयाची होती की, ज्याचा संबंध शरीरातील प्रत्येक अवयव व मानसिकरित्या सर्वांगाला जोडला गेलेला असेल. या उद्देशानेच अल्लाहने रोजांची देणगी आपल्या सर्व भक्तगणांना दिली. अरब देशामध्ये गरीबीमुळे सर्वसामान्य तसेच अती सामान्यांना अंगावर घालायला कपडे नव्हते तर दुसरीकडे ऐशोरामात जीवन जगणारे घमंडी, अहंकारी लोकही राहत होते. या अहंकारी, घमंडी लोक गरीबांच्या जवळही बसणे टाळत होते. गरीबांचा पदोपदी तिरस्कार करीत होते.
या दरम्यान सण २ हिजरीमध्ये रोजे पारीत केले गेले. जसे की प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी फर्मावले की, रोजे म्हणजेच क्षमा करणे होय. ‘क्षमा विरस्य भूषण’ या उक्तीप्रमाणे सबुरी धरा. त्याचे फळ नक्कीच जन्नत (स्वर्ग) आहे. कारण तुमच्याकडे सर्व काही असताना भूखा-प्यासा राहणे ही बाब साधीसुधी नाही. हीच भूख माणसाला गरीबीची जाणीव करून देण्यास पुरेशी आहे.
एके ठिकाणी पैगंबरांनी सांगितले आहे की, ‘रमजान हा गरीबांची जाणीव करून देणार महिना आहे. जेव्हा माणूस स्वतः भुकेल्यापोटी, उपाशीपोटी राहतो तेव्हा, त्याला त्यांची जाणीव होईल. एका उपदेशामध्ये पैगंबरांनी म्हटले आहे जे रमजानमध्ये वाचाळ बडबड करतो, ज्याला कसलीही वैचारिक प्रगल्बता नाही, त्यांनी रोजा करूनही काही उपयोग नाही. म्हणजे शरीराचे सर्व अवयवांनी रोजा करणे आवश्यक असते. जसे की, पंचेज्ञानेंद्रीय अर्थात कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा आदी.
वाचकहो, ज्याप्रकारे रोजा वाईट प्रवृत्तीपासून आपल्याला दूर ठेवतो, त्याचप्रमाणे शरीरावरही तथा मनावरही चांगला परिणाम घडवून आणतो. एवढेच नाही तर कॅन्सरसारख्या दुर्धर आजारापासूनही आपणाला मुक्ती देतो. तसेच प्रत्येकाल रोजा निरोगी बनवितो.