रमाई घरकूल योजनेचा नगरपालिका निहाय आढावा

0

जळगाव। रमाई घरकुल योजनेंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा जिल्ह्यातून मंजूर केलेले अनुदान उपलब्ध असतांना लाभार्थीचा अल्पप्रतिसाद असल्याने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी योजनेचा आढावा घेतला. यामध्ये ज्या लाभार्थ्यांकडे जागा आहे मात्र अनुदान घेण्यास तयार नाही अथवा लाभार्थींने योजनेचा पहिला हप्ता घेतला मात्र काम पुर्ण केलेले नाही अशा जिल्ह्यातील लाभार्थींचे अडचणी, समस्या जाणून घेवून यावर योजना पुर्ण करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याकडे अधिक भर दिला. जिल्ह्यातील नगरपालिका निहाय कामांचा आढावा घेवून कामे लवकरात लवकर पुर्ण करावे असे आदेश देण्यात आले आहे.

पालिकानिहाय कामांचा आढावा
अमळनेर-88, वरणगाव- 0, सावदा-30, जामनेर- 101, यावल-55, रावेर-18, पाचोरा-17, एरंडोल-67, चाळीसगाव-192, फैजपूर-24, धरणगाव-50, पारोळा- 25, भडगाव-36, चोपडा-56 असे एकूण 759 प्रकरणे मंजूर करण्यात आले असून त्यापैकी अमळनेर-28, वरणगाव- 0, सावदा-14, जामनेर- 52, यावल-30, रावेर-8, पाचोरा-11, एरंडोल-34, चाळीसगाव-105, फैजपूर-18, धरणगाव-14, पारोळा- 16, भडगाव-27, चोपडा-36 असे एकुण 393 प्रकरणातील 393 लाभार्थींनी घरे बांधून योजनेचा लाभ घेतला आहे.

अडीच लाख अनुदान मिळणार
सन 2010च्या शासनाच्या आदशानुसार रमाई घरकुल योजनेला शासनाकडून दीड लाख रूपये मिळत होते. त्यानंतर सुधारित आदेशानुसार योजनेच्या प्रत्येक लाभार्थीला अडीच लाख रूपये मिळत आहे. मात्र जुन्या योजनेंतर्गत लाभार्थीला पहिला हप्ता घेतला मात्र घर पुर्ण केले नाही त्यांनी जर सुधारीत आदेशानुसार अडीच लाखाची मागणी केली तर त्याला त्याचा लाभ मिळणार नाही. आणि जुन्या रमाई घरकुल योजनेत लाभार्थींने एकही हप्ता घेतला नसेल मात्र नव्या योजनेंतर्गत अडीचा लाखाचे अनुदान मिळू शकते.

दुबार लाभ घेणार्‍यांवर आळा
रमाई घरकुल योजना लाभार्थींनी अर्ज करून अनुदान मंजूर करून घरकाम पुर्ण केल्यानंतर जर त्याने घर विक्री करत होते. त्यानंतर त्याच व्यक्तिच्या नावे दुसर्‍या यादीतही नाव नोंदवून पुन्हा या अनुदानाचा लाभ घेत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दिसून आले. त्यावर उपाय म्हणून बांधकाम पुर्ण केलेल्या लाभार्थींचे नाव कायमस्वरूपी काढून टाकण्यात येणार असल्याचीही माहिती या बैठकीत देण्यात आली आहे.