मुक्ताईनगर । माजी महसुलमंत्री आ. एकनाथराव खडसे यांची बदनामी झाल्याच्या मु्द्यावर रमेश ढोले यांनी दाखल केलेला दावा हा प्रसिध्दीचा स्टंट असून तो निकाली काढावा अशी मागणी न्यायालयात केल्याचे अंजली दमानिया व प्रिती- मेमन यांनी आज मुक्ताईनगरात न्यायालयाबाहेर पत्रकाराशी बोलतांना सांगितले.
मुक्ताईनगर न्यायालयात हजेरी
आ. खडसे यांच्याविरुध्द कुठलाही पुरावा नसताना प्रिती शर्मा- मेमन व अंजली दमानिया त्यांची जनसमाजात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला भाजपचीही प्रतिमा मलिन करण्यात आली, असा ठपका ंठेवत मुक्ताईनगर भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले यांनी प्रिती शर्मा- मेमन व अंजली दमानिया यांच्याविरुध्द मुक्ताईनगर न्यायालयात 18जुलै,2016 रोजी दावा दाखल केला होता त्या दाव्याच्या कामकाजानिमित्त अंजली दमानीया व प्रिती शर्मा -मेमन मुक्ताईनगर न्यायालयात हजर झाल्या होत्या.
कोलते , दमानिया यांच्यात खुर्चीचा वाद
उपोषणकर्त्याचा घराच्या रस्त्याची विचारपुस करण्यासाठी गेलेल्या अंजली दमानिया व आ. खडसे यांचे स्वीय्य सहाय्यक योगेश कोलते यांच्यात तहसिलदारांच्या कक्षात खुर्चीच्या मु्द्यावर खडाजंगी झाली तहसिलदार जितेंद्र कुवर यांच्या कक्षात उभ्या असलेल्या अंजली दमानीया व त्यांच्या सहकार्यांना बसण्यास खुर्ची नसल्याने त्या संतापल्या होत्या. तेवढ्यात आ. खडसे यांचे स्वीय्य सहाय्यक योगेश कोलते विधीमंडळ अधिवेशनासाठी माहीती घेण्यास आले व तहसिलदाराजवळील खुर्चीवर बसले.त्यावर अंजली दमानीया यांनी हरकत घेल्यानंतर दमानीया व कोलते याच्यात खडाजंगी झाली योगेश कोलते यांनी आपण तहसिलदाराशेजारी शासकिय माहिती घेण्यासाठी बसु शकतो हे पटवून दिल्यानंतर दमानीया यांनी नरमाई घेतली. आमदारांचा 16 वर्षापासून स्वीय्य सहाय्यक आहे.शासनाचे मानधन घेतो त्यामुळे कुठे बसावे हे मला माहिती असल्याचे योगेश कोलते यांनी सांगितले.
दावा तथ्यहिन असल्याचा युक्तीवाद
कोर्टात दमानीया यांनी सांगितले की, बदनामीचा दावा त्रयस्थ व्यक्तीने दाखल केला आहे. असा दावा नियमाने दाखल करता येत नाही पक्षाची बदनामी झाली म्हणून दावा करायचा असेल तर पक्षाध्यक्षाची परवानंगी लागते.पक्षाच्या ती नसल्यास दाव्याला अर्थ राहत नाही त्यामुळे हा दावा निकाली काढावा असा युक्तिवाद दमानीया यांनी केला.