ठाणे । महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे माजी सचिव रमेश देवाडीगा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 5 ऑगस्ट रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ आणि सरस्वती शिक्शण मंडळ आयोजित ही शोकसभा आगरी समाज मंदीर हॉल (प्रगती महाविद्यालय), नांदिवली मार्ग, दत्तनगर (पूर्व) येथे संध्याकाळी 6.00 वाजता होईल. कबड्डीच्या वर्तुळात बुवा म्हणून ओळखल्या जाणार्या रमेश देवाडीगा यांचे गत शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते.