रमेश पाळेकर यांची निवड

0

लोणावळा : मावळ तालुका कबड्डी असोशिएशनच्या अध्यक्षपदी लोणावळ्यातील रमेश पांडूरंग पाळेकर यांची निवड करण्यात आली. मावळातील कबड्डी प्रेमींनी नव्यानेच या संस्थेची नोंदणी केली असून पाळेकर यांना प्रथम अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. यासह तळेगावचे माजी नगरसेवक गणेश काकडे यांची कार्याध्यक्षपदी व वडगाव मावळ येथिल मयुर ढोरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.