हडपसर । रयत शिक्षण संस्था पश्चिम विभागाच्या वतीने कर्मवीर रयत मिनी मॅरेथॉन-२०१७चे राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून येथून पुढे कर्मवीरांच्या नावाने सुरू होणार्या कर्मवीर रयत मिनी मॅरेथॉनसाठी मुले व मुली यांना प्रत्येकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी २५०००,१५०००,१०००० कर्मवीर अण्णांच्या नावे देण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी या मॅरेथॉनसाठी करून स्पर्धेचे उद्घाटन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी धावपटू व खो-खोची राष्ट्रीय खेळाडू स्नेहल जाधव, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, दिलीप तुपे, चेतन तुपे, प्रदीप तुपे, राम कांडगे, विजयराव कोलते, प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी पुणे पश्चिम विभागातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे ९५०० विद्यार्थी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.
एस.एम. टाइम्स न्यूज व युवा स्पंदन भित्तिपत्रकाचे प्रकाशन
याप्रसंगी चेतन तुपे यांनी रांजणी विद्यालयातील खो- खोची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेती स्नेहल जाधव हिला पाच हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले तसेच रयत मॅरेथॉन स्पर्धेत विजेते व सहभागी विध्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी सर्वांना शुभेच्या दिल्या. त्याचबरोबर एस.एम. टाइम्स न्यूज व युवा स्पंदन भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक राम कांडगे यांनी केले. सूत्रसंचालन मामा जगताप यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी मानले.