चाळीसगाव। चालू शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्यासह यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौराव सत्कार तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप रयत सेनेच्या वतीने रविवारी 23 रोजी सकाळी 9:30 वाजता येथील पवार वाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात येणार असून यावेळी मोबाईलचे फायदे व तोटे या विषयावर प्रा. दिलीपसिंग निकुंभ यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार उन्मेष पाटील राहणार असून प्रतिमा पूजन नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.
मोबाईल विषयावर व्याख्यान
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक नितीन पाटील, संजय रतनसिंग पाटील, घृष्णेश्वर पाटील, सुधीर पाटील, महादू पागे, प्रा.रमेश आवटे, डॉ.नरेंद्र राजपूत, अॅड.सागर पाटील, डॉ.संदीप देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, प्रांताधिकारी शरद पवार, तहसिदार कैलास देवरे, शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, ग्रामीण पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ नगर सेविका विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार व गरजू विद्यार्थ्यंना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम होणार आहे. तसेच मोबाईल चे फायदे व तोटे या विषयावर प्रा.डॉ.दिलीपसिंग निकुंभ यांचे व्याख्यान होणार आहे.