रयत सेनेच्या कार्याध्यक्षपदी गायकवाड यांची निवड

0

चाळीसगांव : रयत सेनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील यमाजीवाडी येथील समाज भुषण तात्यासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रयत सेनेेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी ही नियुक्ती आटपाडी येथे झालेल्या कार्यक्रमात केली आहे. रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार हे नुकतेच सांगली जिल्हयात रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटीसाठी गेले असता, त्यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील यमाजीवाडीतील समाज भुषण तात्यासाहेब गायकवाड यांची तेथे झालेल्या कार्यक्रमात 8 डिसेंबर 2016 रोजी पश्‍चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून तशा आशयाचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले आहे. गौ-रक्षण करणारे म्हणून त्यांची सांगली जिल्ह्यात ख्याती आहे. या कार्यक्रमास रावसाहेब चव्हाण, विजय चव्हाण, रणजित चव्हाण, तुषार पाटील, विक्रम पाटील, तेजस पाटील, संदीप गायकवाड, चंद्रकांत दत्तु, मच्छिंद्र बागल, संदीप चव्हाण, बागल सर संजय चव्हाण, प्रतिक चव्हाण, बाबुराव जाधव, संभाजी पाटील, सचिन गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.