रयत सेनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी साळुंखे

0

चाळीसगाव । रयत सेनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सतिष राठोड यांची तर जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी गोरख साळुंखे यांची निवड संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केली आहे. रयत सेनेची बैठक नुकतीच चाळीसगाव येथे पार पडली या बैठकीत रयत सेनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सतिष राठोड यांची तर जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी गोरख साळुंखे यांची निवड संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केली असुन तशा आशयाचे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी पोलीस पाटील संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्त झालेले विनायक मांडोळे यांचा सत्कार सस्थापक अध्यक्ष गणेश पवार यानी केला त्या प्रसंगी अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष मुराद पटेल, प्रदेश समन्वयक पी.एन. पाटील, प्रदेश सचिव प्रमोद वाघ जिल्हाध्यक्ष संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत कदम, तालुका अध्यक्ष बंटी पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, शहर उपाध्यक्ष प्रंशात असबे, आरीफ खाटीक, विजय गायकवाड, राहुल सोनवणे, अनिल बावीस्कर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते या नियुक्तीमुळे चाळीसगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बैठकीदरम्यान पोलीस पाटील संघटनाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्त झालेले मांडोळे यांना गौरविण्यात अांले.