चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगांव तालुक्यातील पथराट येथील रहिवासी ईश्वर पाटील हाळदे यांची रयत सेनेच्या भडगांव तालुका अध्यक्षपदी 29 रोजी चाळीसगाव येथील पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदीर सभागृहात झालेल्या रयत सेनेच्या बैठकीत भडगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन तशा आशयाचे नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी ईश्वर पाटील यांना दिले आहे. शहरातील पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदीर सभागृहात रयत सेनेची बैठक 29 रोजी नुकतीच पार पडली.
अनेकांची होती उपस्थिती
या बैठकीत रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी ईश्वर पाटील (हाळदे) यांची भडगाव तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर केली. ईश्वर भिवराव पाटील (हाळदे) महाराष्ट्र चॅप्पीयन तसेच रॉप्य पदक विजेता असुन ते प्रगतीशील शेतकरी आहेत. याप्रसंगी जिल्हाअध्यक्ष संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पाटील, वारकरी सेना तालुकाध्यक्ष चेतन पवार, अमोल पवार, दिनेश पवार, संदीप असबे, मगेश देठे, धिरज पवार, विवेक देठे आदी उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे प्रदेश सघटक पप्पु पाटील सचिव प्रमोद वाघ, पी.एन.एन पाटील, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिपक राजपुत, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, ज्ञानेश्वर कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर अभिनंदन करण्यात आले.