चाळीसगाव । तालुक्यातील भोरस खु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रयत सेनेतर्फे 25 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात अस्थीरोग, नेत्ररोग आदी 120 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. शिबिरचे उद्घाटन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्याहस्ते करण्यात आले तर प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच प्रमोद पवार, उपसरपंच युवराज कोळी, पोलीस पाटील सचिन पवार यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर डॉ.संदीप देशमुख, बापजी जिवनदिप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच स्री रोगतज्ञ डॉ.अनस खान, नेत्ररोगतज्ञ डॉ.अर्जुन मालवे, अस्थीरोगतज्ञ डॉ.दिपक जाधव यांचा रयत सेना भोरस शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महिलांच्या विविध आजारांची तपसणी
गोरगरीब जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध व्हावी या सकारात्मक दुष्टीकोणातुन रयत सेनातर्फे आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. धावपळीच्या जगात अनेकांना शरीर स्वास्थासाठी वेळ मिळत नसल्याने रयत सेनेतर्फे आरोग्य शिबीर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. शिबिरात महीलांच्या आजारावरील समस्या व अस्थीरोग, नेत्ररोग आदी 120 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी रयत सेना जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोल्हे, तालुका उपाध्यक्ष समाधान मांडोळे, रयत व्यापारी सेना तालुकाध्यक्ष विकास बागड, रोहिदास शिंदे, राजेंद्र पवार, उत्तम पाटील, मंगेश पवार, बापु पाटील, प्रताप शिंदे, सुनिल पाटील, महेश पवार, अनवर खान, अनिल पाटील, दिपक पवार, अशोक पाटील, ज्ञानेश्वर जगतात आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यशस्वितेसाठी यांचे परिश्रम
कार्यक्रमासाठी अधिक परीश्रम सागर पाटील, एकनाथ जगताप, गोपाल पाटील, शरद पाटील, वैभव पवार, जयेश पाटील, सागर पाटील, लखन पाटील, शाम पवार, जगदीश शिंदे, महेंद्र जगताप, दिपक पाटील, प्रविण पाटील, निलेश जगताप, वैभव पाटील आदिनी घेतले. सूत्रसंचालन जयदीप पवार यांनी केले तर आभार स्पनिल पाटील यांनी घेतले.