भुसावळ । येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपा नगरसेवक रविंद्र बाबुराव खरात हे प्रभाग क्रमांक 4 मधील निवडून आले असता डिगंबर बटाऊ सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याचिका दाखल केली होती. रविंद्र खरात यांना 2001 नंतर तिसरे अपत्य असल्यामुळे त्यांच्याविरुध्द सुनावणी याचिका जिल्हाधिकार्यांकडे दाखल केली होती. आज त्यांच्या याचिकेवर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी सदरचे म्हणणे ऐकून 19 तारखेला अंतीम सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. रविंद्र खरात यांना 2001 नंतर जन्माला आलेल्या अपत्याची नोंदणी नामनिर्देशन पत्रामध्ये खरात यांनी नमूद केल्या असल्यामुळे त्यावर डिगंबर सोनवणे यांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे.