लोणावळा : मावळमधून भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्ष श्रेष्टींच्या आदेशानंतर त्यांनी माघार घेली आहे. ही बंडखोरी रोखण्यात विद्यामान आमदार राज्यमंत्री बाळा भेगडे यांना यश आले आहे. अपक्ष उमेदवारी मागे घेत त्यांनी आज सोमवारी भाजपाचे अधिकृत उमेदवार बाळा भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मावळभाजपामधून विधानसभेची उमेदवारी मिळविण्याकरिता राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह भाजयुमोचे माजी अध्यक्ष रविंद्र भेगडे व नगरसेवक सुनील शेळके यांनी प्रयत्न केले होते. मात्र राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उमेदवारी मिळविली. यामुळे सुनील शेळके नाराज झाले. राष्ट्रवादीने शेळके यांना उमेदवारी दिली. मात्र, भाजपचे एकनिष्ठ असलेले रवींद्र भेगडे यांनी बंडखोरी न करता अपक्ष अर्ज दाखल करून नाराजी व्यक्त केली होती.