रविवारी आठवडे बाजार डीपी रोडवर

0

तळेगाव दाभाडे : तळेगाव शहरातील आठवडे बाजार दिनांक 11 मार्च व दिनांक 25 मार्च रोजी नगरपरिषदेच्या संभाजी नगर येथील डीपी रोडवर तर दिनांक 18 मार्च रोजी होणारा आठवडे बाजार रद्द करण्यात आल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे व आरोग्य समिती सभापती अरुण भेगडे पाटील यांनी दिली.

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा उत्सव दि.18 मार्च रोजी होत असल्याने त्या दिवशी आठवडे बाजार रद्द करण्यात आला आहे. तर दिनक 11 रोजी येणार्‍या उत्सवानिमित्त साफसफाई करण्यासाठी व दिनांक 25 रोजी रामनवमी उत्सव असल्यामुळे आठवडे बाजार संभाजी नगर येथील डीपी रोडवर घेण्यात आला आहे.याबाबत भाजीपाला व्यापारी, फळ विक्रेते,कांदा बटाटा व्यापारी इतर व्यापारी नागरिक आदींनी सहकार्य करावे असे आवाहन भेगडे यांनी केले आहे.