रविवारी बडगुजर समाजाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा

0

नंदुरबार। येथील बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे 27 रोजी बडगुजर समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. सालाबादाप्रमाणे यंदाही बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबार व अ.भा.बडगुजर समाज युवक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बडगुजर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, समाजातील पदोन्नती, निवृत्त तसेच विशेष प्राविण्यप्राप्त समाज बांधवांचा सत्कार समारंभ येथील लोकमान्य टिळक सभागृह येथे रविवार 27 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वातजा आयोजित करण्यात आला आहे.

समाजातील मान्यवरांची राहणार उपस्थिती
यावेळी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहेत. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.बडगुजर समाज महासमितीचे राष्ट्रीय अध्यक्ष उमेश करोडपती असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष भगवानशेठ बडगुजर, राष्ट्रीय सचिव राजेंद्र बडगुजर, नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर, सा.बां.विभागाचे भगवानशेठ चव्हाण, सह्याद्री सह. साखर कारखाना कराडचे रविंद्रशेठ बडगुजर, पंचायत समिती नंदुरबारचे प्रमोदशेठ बडगुजर, अमळनेर बडगुजर समाज मंडळाचे अध्यक्ष राजारामशेठ बडगुजर, सा.बां. विभाग नंदुरबारचे नानासाहेब चव्हाण, शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बडगुजर, शिंदखेडा तालुका बडगुजर समाज मंडळाचे उपाध्यक्ष, संतोषशेठ बडगुजर, साप्ताहिक बडगुजर समाजदूतचे संपादक ईश्‍वरसर बडगुजर, अमळनेर बडगुजर समाज मंडळाचे उपाध्यक्ष बापुरावशेठ बडगुजर आदी उपस्थित राहणार आहेत. तरी समाज बांधवांनी विद्यार्थ्यांचा व सत्कारार्थींचा उत्साह वाढविण्यास कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा बडगुजर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीप राघो बडगुजर व संचालक मंडळाने केले आहे.