रविवारी ‘भारत के मन की बात’

0
पुणे : शहर भाजपच्या वतीने येत्या रविवारी ‘भारत के मन की बात’या कार्यक्रमाचे पाचशे ठिकाणी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांत सर्वसामान्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आणि विकास प्रकल्प सुरू केले. आगामी काळात सरकारकडून नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी देशभरात ‘भारत के मन की बात’ कार्यक्र‘मांचे आयोजन करण्यात येत आहे.
पंंतप्रधान मोदी आकाशवाणीच्या माध्यमातून ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता  संवाद साधतात. लोकसभेच्या या सत्रातील शेवटचा कार्यक्रम येत्या रविवारी प्रसारीत होणार आहे. त्यानिमित्त ५०० ठिकाणी ‘मन की बात’चे प्रसारण करून नागरिकांकडून सूचनांचे संकलन केले जाणार आहे.