रविवारी सुटीच्या दिवशीही सुरू राहणार महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र

0

जळगाव: महावितरणकडून वीज बिल शुन्य थकबाकीची मोहीम जोरदार राबविण्यात येत आहे. वीज बील वसूलीसाठी थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीज ग्राहकांना सुटीच्या दिवशीही वीज बिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे. यासाठी महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडल कार्यालय अंतर्गत महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र रविवार दि. 30 सप्टेंबर 2018 रोजी सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.

महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या औरंगााबाद, जालना, जळगाव, धुळे, नंदूरबार, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयातील सर्व घरगुती, व्यापारी व औघोगिक व इतर वीज ग्राहकांकडून चालू व थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणची शुन्य थकबाकी मोहीम जोरदार राबविण्यात येत आहे. थकीत वीज बिलाचा भरणा न केल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे. यासाठी रविवार दि. 30 सप्टेंबर 2018 रोजी शासकीय सुटी आहे. तरीही महावितरणचे कर्मचारी सुटीच्या दिवशीही थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही जोरदार राबविणार आहेत. वीज बिलाच्या थकबाकीसाठी खंडित वीज पुरवठादार ग्राहकांना वीज बिल भरणे सुलभ व्हावे. यासाठी महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र दि. 30 सप्टेंबर 2018 रोजी सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.

तसेच वीज ग्राहकांना सुटीच्या दिवशी घरबसल्या मोबाईल वरून, क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट, कॅश कार्डसह विविध पर्याय तसेच महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर जावून ग्राहक क्रमांक आणि बिलींग युनिट टाकून वीज बिल भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.