रविवारी स्वामीनारायण हर्बल्स दालनाचे उद्घाटन

0

जळगाव  । श्री स्वामीनारायण टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स गेल्या वीस वर्षांपासून सेवेत असून, यासोबतच आता ऑटलर लाईफ प्रा. लि. या नामांकित कंपनीची जिल्ह्यासाठी अधिकृत डिस्ट्रीब्युटर सुरू केली जात आहे. त्यानुसार स्वामीनारायण हर्बल्स या दालनाचा शुभारंभ रविवारी 26 नोव्हेंबरा रोजी होत असल्याची माहिती चंद्रशेखर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्टेडियम कॉम्प्लेक्समधील दालनात आयोजित पत्रपरिषदेस प्रमोद झांबरे, कंपनीचे जे. व्ही. लोखंडे उपस्थित होते. यात आयुर्वेदीक, हेल्थ केअर, ब्युटी केअर, ऍग्रीकल्चर आणि हर्बल प्रॉडक्ट उपलब्ध आहेत.

जिल्हास्तरीर डिलरशिप
हे सर्व साहित्य विक्रीसाठी जिल्हास्तरीय डिलरशीप घेण्यात आली असून, या भव्य दालनाचे उद्घाटन रविवारी दुपारी चारला कंपनीचे फाउंडर राम शर्मा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हर्बल पॉडक्टमध्ये पोटातील विकार, जुलाब यावरील गोळ्या, शरीर आणि त्वचेतील पेशींना सक्रीय करण्यास उपयुक्त सांध्यांना मजबूत करण्यासाठीचे स्टेमोलार कॅप्सूल, हार्टअटॅक, डोळ्यांवरील व सांध्याचे आजार, पचन क्रिया सुधारण, स्मरणशक्ती वाढविणे, मधुमेह, कॅन्सर, प्रतिकार शक्ती वाढविणे, लहान मुले व वयोवृद्धांना कॅल्शिअमची कमी असल्याने त्यांच्यासाठी कॅल्शिअल ड्रॉप, डेंटोलार टुथपेस्ट, तसेच इंटोलर इजो ग्रीन टी- या चहापासून ऍसिडीटी होत नाही आणि कोरा चहा पिल्यास शरीरातील घाण बाहेर टाकत असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. याशिवाय, ब्युटी केअर प्रोडक्टमध्ये हर्बल क्लीनअप फेसवॉश, शॅम्पू, फेसपॅक, फेअरनेस क्रीम, फेस स्क्रब, एंटी एजिंग क्रिम, ऍग्रोक्योरमध्ये पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी पिांकवर किटकनाशके टिकवून ठेवण्यासाठी आणि पिके ताजे टवटवीत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.