रविवारी होणार सोसायटी स्पोर्टस मिटचे उद्घाटन

0

चौंधे पाटील स्पोर्टसच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन

पिंपरी : येथील चौंधे पाटील स्पोर्टसच्या वतीने तिसर्‍या वार्षिक इंटर सोसायटी स्पोर्टस मिटचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी (दि. 11 रोजी) सकाळी महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका आरती चौंधे, ममता गायकवाड, नगरसेवक संदिप कस्पटे, तुषार कामठे, पीसीएमटीचे माजी अध्यक्ष सुरेश चौंधे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संचालक संकेत चौंधे यांनी दिली.

विविध स्पर्धांचे आयोजन
या इंटर सोसायटी स्पोर्टस मिट अंतर्गत क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन आणि लॉन टेनिसच्या स्पर्धा होणार आहेत. वयोगट मुले व मुली 10,13 व 16 वर्षांखालील सोसायटी संघाने सहभाग घ्यावा. तसेच पुढच्या रविवारी (दि.25 रोजी) सकाळी 6 वाजता सर्व वयोगटातील इच्छुकांसाठी 2, 4 व 6 किलोमीटर खुल्या मॅरेथोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी दि. 25 रोजी सकाळी चौंधे पाटील स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे. या स्पर्धांमध्ये भाग घेऊ इच्छिणार्‍या स्पर्धकांनी 9158961010 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.