नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यामध्ये झालेला ट्विटरवरील वाद आता थेट कोर्टात जाण्याची शक्यता आहे. रविशंकर प्रसाद यांनी एक ट्विट करुन शशी थरूर हे हत्येचे आरोपी असल्याचे म्हटले होते. थरूर एका हत्येच्या प्रकरणात आरोपी आहेत. त्यांनी भगवान शंकराचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. एका काँग्रेसच्या खासदाराने एका हिंदू देवतेच्या केलेल्या या व्याख्येसंदर्भात स्वत:ला शिवभक्त म्हणवणाऱ्या राहुल गांधीकडून उत्तर अपेक्षित आहे. राहुल गांधीनी सर्व हिंदूंची माफी मागायला हवी, असे ट्विट रविशंकर प्रसाद यांनी केले होते. शशी थरूर यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून रविशंकर प्रसाद यांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले आहे.
हत्या के आरोपी कांग्रेस सांसद शशि थरूर ने शिवलिंग को चप्पल मारने वाला एक बयान दिया है जो भर्त्सना के लायक है।
राहुल गांधी जो शिव भक्त होने का दावा करते हैं बताएं की शिवलिंग और भगवान शंकर के इस अपमान का क्या वो समर्थन करते हैं? यदि नहीं तो हिन्दुओं से माफी मांगे। pic.twitter.com/UD61ANRmdl
— Ravi Shankar Prasad (@rsprasad) October 28, 2018
नोटीसमध्ये रविशंकर यांनी थरूर यांच्यावर खोटे आणि अपमानास्पद आरोप केल्याचे म्हटले आहे. तसेच ४८ तासांमध्ये रवीशंकर प्रसाद यांनी माफी मागावी अथवा कायदेशीर कारवाईसाठी तयार रहावे असेही थरूर यांनी आपल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.
शशी थरूर हे सध्या ‘द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर’या आपल्या नव्या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंडीवर बसलेल्या विंचवासारखे असल्याचे वक्तव्य थरूर यांनी केले होते. बेंगळुरु लिट फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या थरूर यांनी आपल्याच पुस्तकातील काही पाने उपस्थितांसमोर वाचून दाखवली.