मुंबई । दोनच दिवसांपूर्वी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्शक आणि सहाय्यक प्रशिक्शकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. पण या नेमणूकांनतरही प्रशिक्शक निवडीचे कवित्व अजून संपलेले नाही. आपल्या पसंतीचा गोलंदाजीचा प्रशिक्शक नसल्यामुळे शास्त्री नाराज असून, गोलंदाजीच्या प्रशिक्शक म्हणून नेमण्यात आलेल्या झहीर खानची संघातील नेमकी भूमिका जाणून घेण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीची भेट घेणार आहेत. रवी शास्त्री यांची गोलंदाजीचा प्रशिक्शक म्हणुन भारत अरुण यांना पसंती आहे. त्यामुळे गोलंदाजीच्या प्रशिक्शकाची नेमणुक करताना क्रिकेट सल्लागार समितीने आपले मत विचारत घेतले नसल्याचा दावा शास्त्री यांनी केला आहे. शास्त्री भारतीय संघाचे संचालक असताना अरुण भारत यांनी गोलंदाजीच्या प्रशिक्शकाची जबाबदारी सांभाळली होती. 2014 मध्ये जो डावेस याच्या जागेवर अरुण यांची गोलंदाजीच्या प्रशिक्शकपदी नेमणुक करण्यात आली होती. त्यानंतर रवी शास्त्रींकडून पद काढून घेईपर्यंत ते कार्यरत होते. भारत अरुण यांनी 1986 च्या मोसमात श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 54 वर्षीय अरुण यांनी भारतासाठी दोन कसोटी आणि चार एकदिवसीय सामने खेळले आहेत.
गोलंदाजीचा प्रशिक्शक कोण असावा असा प्रश्न सल्लागार समितीने विचारल्यावर शास्त्रींनी अत्यंत विश्वासू असलेल्या भारत अरूण यांचे नाव सुचवले. पण भारत यांच्या नावाला क्रिकेट सल्लागार समितीतील एका सदस्याचा विरोध होता. त्यानंतर शास्त्रीनी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीचे नाव सुचवले. गिलेस्पीची जगातील सर्वोत्तम गोलंदाजीचा प्रशिक्शक म्हणून गणना होते. गिलेस्पी सध्या पापुआ न्युगिनी संघाशी करारबध्द आहेत. त्यामुळे गिलेस्पी बीसीसीआयचा प्रस्ताव स्विकारणार नाही याची चाणाक्श शास्त्रींना माहिती होती. त्यामुळे भारत अरूणचे पारडे जड करण्यासाठी शास्त्रींनी गिलेस्पीच्या नावाचा वापर केला.
व्यंकटेश प्रसादचे नाव राखीव ठेवले
बीसीसीआयने माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याचे नाव गोलंदाजीच्या प्रशिक्शकपदासाठी राखीव ठेवले आहे. पण शास्त्री अरूण यांच्याशिवाय दुसर्या नावाला संमती देतील असे कोणाला वाटत नाही. याशिवाय प्रसाद बाबतही संघातील खेळाडूंच्या तक्रारी आहेत. प्रसाद संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्शक असताना त्याने वेगवान गोलंदाजांचा सरळ टप्पा पकडणार्या मध्यमगती गोलंदाजांमध्ये बदल केल्याचा आरोप केला जातो.
शास्त्री-अरूण जुने मित्र
भारत अरूण यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्द चांगली नसली तरी प्रशिक्शक म्हणून त्यांचे नाव आहे, वेगवान गोलंदाजीशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टी, बाबीवर त्यांची चांगली पकड आहे. अरुण आणि शास्त्री यांनी 80 च्या दशकातील सुरुवातीच्या वर्षांमध्ये 19 वर्षाखालील संघाचे एकत्रित प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे या दोघांची मैत्री तेव्हापासून आजतागायत कायम आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गोलंदाजींचे प्रशिक्शक म्हणून काम पाहणार्या अरूण यांच्या नावाची शिफारस शास्त्रींनी तत्कालीन अध्यक्श एन. श्रीनिवासन यांच्याकडे केली होती. या शिफारसीमुळे श्रीनिवासन यांनी अरुणला गोलंदाजीचा प्रशिक्शक केले.
झहीरच्या मानधनचा मुद्दा कळीचा
झहीर खानने गोलंदाजीचे प्रशिक्शकपद सांभाळावे याकरता बीसीसीआयने याआधीही प्रयत्न केले होते. त्यावेळी झहीरने मागीतलेले चार कोटी रुपयांचे मानधन आड आले होते. आताही एवढे मानधन झहीरला दिल्यास त्याला पूर्णवेळ संघासोबत रहावे लागणार आहे. झहीरने अद्याप नवीन जबाबदारीसाठी होकार दिलेला नाही. पण एकदा करारबद्ध झाल्यावर झहीरला संघासोबत श्रीलंकेच्या दौर्यावर जावे लागेल. याशिवाय झहीरने हा प्रस्ताव मान्य केल्यास राहुल द्रविडप्रमाणे त्यालाही आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातील जबाबदारी सोडवी लागेल. असे झाल्यास बीसीसीआयला राहुल द्रविडप्रमाणे झहीरलाही नुकसान भरपाई द्यावी लागेल. त्यामुळे प्रशिक्शक नेमणुकीसंदर्भात बीसीसीआयने आखलेले आर्थिक अंदाजपत्रक कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल द्रविडही आयपीएलमधील फ्रॅचायझीशी निगडीत होता. भारतीय ज्युनिअर संघाचा मार्गदर्शक पदांवर नेमणूक झाल्यावर द्रविडच्या परस्पर हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी बीसीसीआयने राहुल द्रविडला भरपाई दिली होती.
झहीरने आराखडा करावा
झहीर खान संघासोबत पूर्णवेळ, वर्षातील 250 दिवस असणार का? हा मुद्दा आता कळीचा ठरत आहे. राहुल द्रविड प्रमाणे झहीरही प्रशिक्शक नसून तो गोलंदाजांसाठी सल्लागार असल्याचा मतप्रवाह आहे. त्यामुळे शास्त्री यांनी झहीरच्या नेमक्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला आहे. शास्त्री यांना संघासोबत पूर्णवेळ प्रशिक्शक पाहिजे आहे. त्यामुळे झहीर सल्लागाराचे काम पाहणार असेल तर त्याने गोलंदाजांसाठी आराखड तयार करुन द्यावा, भारत अरूण त्याची अंमलबाजवणी करतील असा पर्यायही शास्त्रीं यांनी सुचवला आहे.
झहीर 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस उपलब्ध नसणार. पूर्णवेळ प्रशिक्षकासाठी वर्षातील 250 दिवस संघासोबत असणे जरुरीचे आहे.
क्रिकेट सल्लागार समितीने गोलंदाजीचा प्रशिक्षक नेमताना विश्वासात घेतले नसल्याचा रवी शास्त्री यांचा दावा
झहीर खानला पाहिजे आहे 4 कोटी रुपये मानधन. एवढे मानधन देण्याची बीसीसीआयची इच्छा नाही. झहीरचा अद्याप होकार आलेला नाही.