रवी शास्त्रींबाबत संभ्रम

0

नवी दिल्ली । भारतीय भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षपदी अखेर रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काल मुंबईत पार पडलेल्या मुलाखतीनंतर मंगळवारी क्रिकेट सल्लागार समितीने याविषयीची घोषणा केली आहे. रवी शास्त्री यांनी स्काईपद्वारे सल्लागार समितीला मुलाखत दिली होती. एएनआय यावृत्तसंस्थेने या विषयीची माहिती दिली आहे. भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात झालेल्या वादानंतर कुंबळेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

हे दोन प्रश्‍न का विचारण्यात आले?
मुलाखती दरम्यान विचारण्यात येणार्‍या प्रश्‍ना मागचे मुख्य कारण असे होते की, कुंबळेना वादावादी परिस्थितीत अचानक आपला राजीनामा द्यावा लागला होता. त्यांवेळी कपतानाचे विराट सोबत वाद होत होते. या संबंधी माहिती ठेवणारे बीसीसी आईच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने पीटीआयला सांगितले की, अंतीम निर्णय हा सीएसीचाच होणार, विराट कोहलीचा नाही.

बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी नवीन अर्ज मागवले होते. त्यात कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडूंचा रवी शास्त्री यांच्या नावाला पाठींबा असल्यामुळे शास्त्रींची या जागेवर निवड पक्की मानली जात होती. प्रशासकीय समितीने बीसीसीआयला प्रशिक्षकपदाचे नाव जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार 2019 च्या विश्वचषकापर्यंत शास्त्री संघाचे प्रशिक्षक राहणार आहेत. अशी चर्चा सकाळपर्यंत सुरू होती मात्र,बीसीसीआयने दुजोरा न दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

उमेदवारांच्या मुलाखतीचा सिलसिला
कोहली-कुंबळे वादानंतर भारतीय संघाच्या कामगिरीत बदल घडवून आणण्याची मोठी जबाबदारी आता रवी शास्त्री यांच्या खांद्यावर असणार आहे. टिम इंडियाच्या कोच पदासाठी घेण्यात आलेल्या इंटरव्ह्यूमध्ये पाच उमेदवारांना दोन महत्त्वाचे प्रश्‍न विंचारण्यात आले होते. या उमेदवारांमध्ये वीरेंद्र सेहवाग, रवि शास्त्री, टॉम मूडी, रिचर्ड पायबस आणि लालचंद
राजपूत यांचा सहभाग होता. या उमेदवारांना विचारण्यात येणार्‍या दोन प्रश्‍नातील पहिला प्रश्‍न असा होता की, इग्लंडमध्ये होणार्‍या 2019 च्या विश्‍व कपसाठी त्यांची स्वतःचा विचार काय आहे. आणि दुसरा प्रश्‍न असा होता की, कँपटनच्या तुलनेत कोचची भूमिका काय असते. त्याचबरोबर या प्रश्‍नांसोबतच त्यांना असेही विचारण्यात आले की, कोणत्याली नाजूक परिस्थितीत त्या परिस्थितीचा सामना ते कसे करतील.

कोहलीशी केली सल्लामसलत
बीसीसीआयच्या क्रिकेट सलाहकार समिती (सीएसी) यांनी सौरव गांगुली, सचिन तेंडूलकर आणि वीवीएस लक्ष्मण यांनी या इंटरव्ह्यूच्या नंतर सांगितले की, कोणतीही घोषणा करण्याआधी ते विराट कोहलीशी चर्चा करतील आणि कर्णधाराला फक्त समितीच्या निर्णयामागील कारण फक्त सांगण्यात येईल. त्याबाबत त्याचा दृष्टिकोन विचारण्यात येणार नाही.