रवी शास्त्रीला प्रशिक्षक करा; विराट कोहलीची लॉबिंग

0

मुंबई। भारतीय संघ त्यामधील वाद यांनी कधीच पाठ सोडलेली नाही.बीसीसीआय समिती असो की त्यावरील पदाधिकार्‍याची यांचा वाद संपुर्ण जगाला माहित आहे.तर त्यात अजुन भर पडली ती भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे व कर्णधार विराट कोहली याच्या वाद जो आजही सुरू आहे.जरी यावर दोन्ही जण काही स्पष्ट केलेले आहे.तर दुसरीकडे विराटने कुंबळे याच्या जागेवर नवीन प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री याचे नाव सुचवले आहे.यासाठी प्रशिक्षक निवड समितीवर असलेल्या सदस्यांची विराटने भेट सुध्दा घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

काही दिवसांपूर्वीच इच्छूक उमेदवारांकडून टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यानंतर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि अनेक परदेशी संघांच्या प्रशिक्षक पदाचा दीर्घ अनुभव असलेले टॉम मुडी ही दोन मुख्य नावे चर्चेत होती. तसेच अनिल कुंबळेची प्रशिक्षक म्हणून गेल्या एका वर्षातील यशस्वी कामगिरी पाहता तोदेखील या स्पर्धेतील मुख्य दावेदार मानला जात आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ही त्रिसदस्यीय समिती प्रशिक्षकाची निवड करणार आहे. त्यासाठी निवड समितीकडून गुरूवार किंवा शुक्रवारपासून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

तर कर्णधार विराट कोहली हा माजी व्यवस्थापक रवी शास्त्री यांनी अर्ज न करताही त्याच्या नावासाठी लॉबिंग करित असल्याची चर्चा आहे. यासाठी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी 23 मे रोजी कोहली सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना भेटला होता. त्यावेळी विराटने शास्त्री यांना मुलाखतीसाठी बोलवावे, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता. मात्र, शास्त्री यांनी अर्जच दाखल न केल्याने आता त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार नाही. आजच्या भारत-श्रीलंका सामन्यानंतर मुलाखत प्रक्रियेला सुरूवात होईल. यावेळी निवड समिती अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, रिचर्ड पायबस, लालचंद राजपूत आणि डोडा गणेश या सहा जणांच्या मुलाखती घेईल. त्यानंतर सविस्तर चर्चा करून भारतीय संघाचा प्रशिक्षक कोण असेल, याचा निर्णय घेतला जाईल.